सिल्लोड (प्रतिनिधी): श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त सिल्लोड शहरात गुरुवार (दि. २६) रोजी सायंकाळी भक्तिमय वातावरणात भव्य सवाद्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शहरातील श्रीराम मंदिरातून महाआरतीने शोभायात्रेला प्रारंभझाला होता. ढोल ताशांच्या गजरात, भगव्या पताका आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी शोभायात्रेत सहभागी होत प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देत, सण उत्सव हे समाजात एकात्मता, सद्भावना आणि बंधुभाव वाढवणारे असतात, असा संदेश दिला.
याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, माजी सभापती रामदास पालोदकर, संजय मुरकुटे, रवी गायकवाड, शिवा टोम्पे, विजय खाजेकर, गौरव सहारे, सुनील पांडुरंग दुधे, फहिम पठाण, जितू डिडोरे, सतीश सिरसाट, किरण वाघ, आनंद सिरसाट आदिंसह रामभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.












